प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMi vayachya 14 varshapasun hastmaithun karto mazhe Ata 30 asun mazhe linga la Thatrat alywar elbow pramane bend Hote..

Mi vayachya 14 varshapasun hastmaithun karto mazhe Ata 30 asun mazhe linga la Thatrat alywar elbow pramane bend Hote Mi jeva pasun hastmaithu karto tyvels kadhi kadhi mi doni payachya madhe ling dabyacho pan ty mule ling bend nahi na zhale asve ling straight honya sathI kahitari upya sanga lingachi size hi pahilya pramane raht nahi ani ratri zhoptana innerwear n ghalta zhopane he vrushan sathI faydeshir aste ka tasech Lagna nantar kahi problem hou shakto ka ling bend jari asle tar sex karnymadhe kahi adchani yeu shaktat ka mediCal madhe milanari shilajit gold , vitax gold hi faydeshir astat ka ffitness mule lingala Navin chetana yete ka plz help us

1 उत्तर
Answer for bend answered 8 years ago

तुम्ही एकाचवेळी तब्बल पाच प्रश्न विचारले आहेत. काही प्रश्न एकमेकांशी जोडलेले असल्यामुळं त्यांची उत्तरं एकत्र लिहित आहोत.

हा एक मोठा गैरसमज आहे की हस्तमैथुन केल्यामुळं लिंग वाकडं होत. हस्तमैथुनामुळं लिंग वाकडं होत नाही. दोन्ही पायांमध्ये लिंग दाबल्यामुळंदेखील वाकडं होत नाही. लिंग नैंसर्गिकरित्या डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेलं असतं. लिंगामध्ये थोडाफार बाकदेखील असतो. यात काळजी करण्यासारखं काही नाही. लिंगामध्ये नैसर्गिकरित्या बाक असल्यामुळं त्याला सरळ करण्याचा उपाय नाही. शिवाय लिंगामध्ये असलेल्या बाकामुळं सेक्स करताना काहीही समस्या येत नाही.

लिंगाची साईज पहिल्याप्रमाणे राहत नाही याचा नीटसा अर्थ तुमच्या प्रश्नामधून कळत नाही. लिंग ताठ होण्यामध्ये काही समस्या असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.

रात्री झोपताना इनरवेअर घातल्यामुळं किंवा न घातल्यामुळं काही विशेष फरक पडत नाही. काळजी ही घेतली पाहिजे की आंघोळ झाल्यावर वृषणांच्या अजूबाजूची जागा स्वच्छ व कोरडी ठेवली पाहिजे.

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्या किती फायदेशीर असतात यावर शंका आहे. शिवाय अशा गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावयच्या असतात. परंतू यापेक्षा महत्वाचं असतं की तुम्ही नियमित व्यायाम करुन शरीर तंदुरुस्त ठेवा. यामुळं शरीराची ताकद चांगली टिकून राहते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 5 =