प्रश्नोत्तरेCategory: Public Questionslaingik sambandha alyavar nehami yonitun rakat yete 
1 उत्तर

हे काळजी करण्यासारखं लक्षण आहे. प्रत्येक वेळी लैंगिक संबंध झाल्यावर रक्त येणं योग्य नाही. योनिमार्गामध्ये काही जखमा असतील, गाठी असतील किंवा इतर कारणाने संबंधानंतर रक्त येऊ शकते. गर्भाशयाच्या मुखाला म्हणजेच ग्रीवेला काही जखम किंवा व्रण असेल तर रक्त येऊ शकते. 
लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात जाऊन आतून तपासणी करून घ्या. ग्रीवा आणि योनिमार्गामध्ये काही जखम किंवा गाठ, व्रण नाहीत ना याची खात्री करून घ्या. स्त्री रोग तज्ञांना भेटून तुम्हाला जाणवणारी लक्षणं मोकळेपणाने सांगा आणि सर्व तपासण्या करून घ्या.
टेन्शन घेऊ नका पण काळजी नक्की घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 15 =