प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsBoyfriend ne jorat kele yoni fatli aata far dukhte

1 उत्तर

योनीमध्ये एक पातळ पडदा जन्मतःच असतो. याला इंग्रजीमध्ये हायमन असं म्हणतात. हा पडदा पातळ किंवा लवचिक असतो. शारीरिक खेळ जसं पळणे, सायकल चालवणे इ. मुळं हा फाटू शकतो. काही वेळेस पहिल्या संभोगाच्यावेळी हा पडदा फाटू शकतो. त्यावेळी थोडं रक्त येणं आणि दुखणं  नैसर्गिक आहे. पण याला योनी फाटली हा शब्दप्रयोग योग्य नाही.
जर तुम्हाला हे उत्तर पुरेसं वाटत नसेल तर तुम्हाला नक्की काय विचारायचं आहे?  हे आम्हाला पुन्हा नक्की कळवा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

Vijay bharat latthe replied 8 years ago

Sex karnyasathi yogya vay konta asta

I सोच replied 8 years ago

भारतामध्ये कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील व्यक्तीसोबत सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याचा अर्थ आज १८ वर्ष पूर्ण झाली म्हणजे उद्या लगेच सेक्स केला. असंही होत नाही. वयासोबतच सेक्स करण्ण्याची इच्छा, मासिक तयारी, संमती, जबाबदारीची जाणीव या गोष्टीही वायाइतक्याच महत्वाच्या आहेत.

भारतामध्ये कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील वय हे संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय, हे कळण्याचं हे वय नाही असे मानले जाते. त्यामुळे १८ वर्षाच्या आतील व्यक्तीसोबत जर कोणी लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. स्वतःच्या लैंगिक सुखासाठी १८ वर्षाच्या आतील व्यक्तीच्या लैंगिक अवयवांना हात लावणे, लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. याशिवाय जर कोणी खोटी आश्वासने, लग्नाचे आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो. बाल लैंगिक शोषणाचे मुलांच्या मनावर खूप नकारात्मक आणि दूरगामी परिणाम होतात. तुम्हाला जर कोणी असं करताना आढळले तर ताबडतोब त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 12 =