प्रश्नोत्तरेस्त्रीच्या स्तनांविषयी

काही स्त्रीच स्तंनाच निप्पल व आजुबाजुची त्वचा ही वेगवेगळी का असते?? जसे की काही निप्पल काळे ,चॉकलेटी तर काही गर्द गुलावी किंवा फिकट गुलाबी अस का असते ?? त्याचबरोबर निप्पल काही स्त्रियांचे मोठे जाड असतात.तर काहीचे बारीक आणि कमी लांबीचे असा बदल कशामुळे होतो आणी अजुन एक प्रश्न ज्या वेळेस पुरूष संभोग करतांना स्त्रीच निप्पल तोंडात घेऊन ती जर बाळतीणं असेल तर तिचे दुध पितो . तर ते तिला आवडते का ? तिला त्यातून आनंद मिळतो का ती जास्त उत्तेजित होते का ? आणि पुरुष ऐवजी जर बाळ दुध पित असेल तर ति तेव्हापण उत्तेजित होते का ? तेव्हा तिला संभोग करावासा वाटतो का?? आणि आपले खुप आभार तुमच्या प्रश्नांउत्तरामुळे खुप काही चिंताच समाधान होते . असेच तुमच कार्य चालू दया.

2 उत्तर

तुमच्या पहिल्या प्रश्नाचं अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं झाल्यास ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. स्तनांचे आकार आणि स्तनांचा आणि स्तनांग्रांचा आकार आणि रंग वेगवेगळा असू शकतो आणि यात काहीही गैर नाही. हे अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकाचा रंग, उंची वेगवेगळी असते अगदी तसंच.

बाळाच्या पोषणासाठी निसर्गतः स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार होते. हे बाळाचे अन्न असल्याने त्याचे काही दुष्परिणाम नाहीत, यात काही शंका नाही. आता राहिला प्रश्न हे दुध प्यायचे की नाही किंवा स्त्रीला ते आवडते की नाही. याचे आपण एक असे उत्तर देऊ शकणार नाही. कारण हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडेलच असे नाही.

आता तुमचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न बाळ दुध पीत असताना स्त्रीला संभोग करावासा वाटतो का किंवा ती उत्तेजित होते का? याचेही नेमके उत्तर देणे अवघड आहे. साधारतः एखद्या व्यक्तीच्या मनात लैंगिक इच्छा निर्माण झाली की तिला लैंगिक उत्तेजना मिळते आणि संभोग करावासा वाटतो. कोणाच्या मनात कशामुळे लैंगिक इच्छा होणार हे आपण कसे ठरविणार?

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 10 =