Chest Hairs asked 8 years ago

I am 33 yrs old man..unmarried. I dont have hairs on my chest.. please suggest foods to grow hairs on chest..

Girls mostly prefer man who has hairy chest .why so?

2 उत्तर
Answer for Chest Hairs answered 7 years ago

वयाच्या 10 व्या वर्षानंतर लैंगिक संप्रेरकं शरीराच्या आकारावर नियंत्रण आणायला सुरुवात करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. यामुळे पौगांडा अवस्थेत शरीराच्या बऱ्याच भागावर केस यायला लागतात.

दाढी, मिशा येणे, काखेमध्ये, लिंगाजवळ, आणि गुदद्वाराच्या आसपास केस यायला चालू होतात. तसेच वृषणावर सुध्दा केस येऊ लागतात. काही मुलांना छाती आणि पाठीवरही केस येतात. किंवा काही मुलांच्या अंगावर कधीच केस येत नाही. केस केव्हा आणि किती येतील, या गोष्टी अनुवांशिक गुणधर्मावर आधारित असते. काही मुलांना वयाच्या 11 वर्षी तर काहींना 15 वर्षी केस येणं चालू होतं. काही जणांच्या शरीरावर फारसे केस नसतात.

प्रत्येकाची लैंगिक आवड, अभिव्यक्ती ही वेगवेगळी असते. म्हणूनच सगळ्याच मुलींना छातीवर केस असलेले पुरुष आवडतात असे नाही. अंगावरच्या केसांचा किंवा दाढीमिशांचा पुरुषत्वाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे छातीवर केस नाहीत म्हणून काळजी करू नका, स्वतःला कमी लेखू नका किंवा किंवा अपराधी वाटून घेऊ नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =