सर्वात पहिल्यांदा प्रश्नातील महत्वाच्या गोष्टीवर बोलू या. तुमचं लिंग लहान आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? पॉर्न क्लिप्स पाहून किंवा इतरांच्या लिंगाकडं पाहून तुम्हाला असं वाटत असेल तर चिंता करणं सोडून द्या. पॉर्न क्लिप्समध्ये अनेकवेळा अतिरंजित कल्पना दाखवलेल्या असतात. त्यामध्ये दाखवलेले लिंगाचे आकार हे खरे असतीलच असं नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तिनुसार लिंगाचा आकारदेखील बदलत असतो. लिंगाच्या आकारामुळं संभोगाच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही. संभोगाचा आनंद हा परस्परांच्या समजदारीनं वाढवता येतो. त्यामुळं लिंग लहान असेल तरी संभोग करण्याच्या पध्दतीत काही बदल होत नाही.
खूपच कमी पुरुषांचे लिंग अतिशय लहान असते. ज्यामुळं संभोग करणं शक्य होत नाही. अशावेळी डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर राहतं.