प्रश्नोत्तरेगर्भधारणा झाली अाहे हे नक्की कधी कळते व गर्भधारणा झाल्यास कधी कधी किंचित रक्तस्त्राव होतो का?
1 उत्तर

साधारणपणे मासिक पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन झाल्यावर १२-१६ दिवसांनी पाळी येते. गर्भधारणा झाली तर पाळी येत नाही. त्यामुळे जर लैंगिक संबंध आले असतील, कोणतंही गर्भनिरोधक वापरलं नसेल आणि नेहमीप्रमाणे पाळी वेळेवर आली नाही तर गर्भधारणेची शक्यता आहे असं समजावं. कधी कधी गर्भधारणा झाल्यावर पाळी येत नाही मात्र एक दोन थेंब रक्तस्राव होतो. मात्र मनात शंका असल्यास लवकरात लवकर गरोदरपणाची टेस्ट करू घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 18 =