जोडीदाराला एच. आय. व्ही. असेल तरी, संभोग काळात चांगल्या गुणवत्तेचा कंडोम वापरल्यास एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी होतो. पण तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. कंडोम योग्य रीतीने वापरला नाही किंवा तो निकृष्ट दर्जाचा असेल तर एच. आय. व्ही. किंवा लैंगिक संबंधांतून पसरणारे इतर संसर्ग होऊ शकतात.
एच. आय. व्ही. किंवा इतर लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत यासाठी जर समोरच्या व्यक्तीला जर असे आजार असतील तर संभोग टाळावा. लैंगिक संबंध टाळणे अगदीच शक्य असेल तर योनीमैथून किंवा गुदमैथुन न करता इतर मार्गाने म्हणजेच फोर प्ले करून परस्परांना लैंगिक आनंद मिळवता येईल.