Confused about relationship asked 4 years ago

Me gramin bhagatun aloy mpsc tayari sathi . Mala gf ahe. Amhi 3 yr relationship madhe ahot. Me Prem serious asat ya vicharacha ahe. Ani serious rahto . Pan punyat alyavr Mitra kinva etar goshtinmule mala insecure feel hot Karan ekade fact sex kinva timepass karnare khupach ahet. Fasavane kinva double date. Tr mala tyamule mazya relationship madhe asa hou naye asa mala vatat. Sex ya goshti lagnanantr asa doghahi samajto ..ani atta carrier karaych asech vichar ahet. Me fasavla jau naye kinva tila gamau naye ya depression madhe ahe. Tyacha parinam mazya study vr hoto. Ti Sudha changali ahe. Pn mala sarakhe yavishayi apayashi tharnyache vichar yetat. Ani alikde web series madhe pn ya asalya relationship, sex dakhavtat. Me baghan band kel ahe. Pan ajubajula sarkh ashi mul vagere mule me srakha nervous feel karto yasabandhiche vichar yetat. Ata khar Prem vagere goshti asatar tari ka?. Mala ya vicharatun baher padun study vr focus karaycha ahe. Ti Sudha mala khup samjavate. Ghari attach nko sangay mhnun Nahi sangat. Vel jatoy plz ans.

1 उत्तर

तुमचे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. तुम्ही आणि तुमची जोडीदार दोघांनाही नात्याविषयी स्पष्टता आहे मग उगाच चिंता कशाला करता? तुम्ही आणि तुमची जोडीदार गांभीर्याने बघते मग बाकीचे त्यांच्या त्यांच्या नात्याकडे कसे बघतात याचा तुमच्या नात्यावर मानसिकतेवर परिणाम करून घेण्याची काहीच गरज नाही. शिवाय आपण आपल्या स्वतःविषयी ठरवू शकतो. नाही का? इतरांनी त्यांच्या नात्याकडे सेक्सकडे कसे बघावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मानावे आणि सोडून द्यावे.

आजूबाजूच्या परिस्थितीमुळे नाराज न होता, तुमच्या नात्याला वेळ दिला, त्याविषयी आणखी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलात तर अधिक उपयोग होईल. अनावश्यक विचार करून आपण आपली एनर्जी कशाला वाया घालवायची? प्रत्येक नाते वेगळे असते त्यामुळे इतरांच्या बाबतीत जे होईल तसे तुमच्या बाबतीत होईलच असे नाही. आजूबाजूला काही तुमच्या विचारांची, सकारात्मक नाती देखील आहेत. त्याकडे बघा. सकारात्मक राहा. या जगात प्रेम आहे हे नक्की. पण प्रत्येकाची प्रेमाची, नात्याची व्याख्या वेगळी असते. तुम्ही तुमची व्याख्या ठरवा आणि त्याबाबत जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. तिचीही काही व्याख्या असेल, त्याचाही विचार करा आणि दोघे मिळून तुमच्या नात्याविषयी ठरवा.

आणखी एक सुचवायचे आहे, तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे त्याचा पुनर्विचार करावा असे वाटते. ताण नात्यात अपयश येईल हा आहे? अभ्यासाचा आहे? जोडीदारावरचा विश्वास कमी पडतोय? घरच्यांना कन्विन्स करण्याचे टेन्शन आहे की आणखी काय? तुम्हाला नाराज वाटण्याचे नेमके कारण पुनर्विचार करून शोधावे असे वाटते.

तुम्हाला तुमच्या नात्यासाठी, करियरसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक सदिच्छा !!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 2 =