प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळी मध्ये जर जेवणात मासिक पाळीचे रक्त खाल्याने काय होते

मासिक पाळी मध्ये जर जेवणात मासिक पाळीचे रक्त खाल्याने काय होते

1 उत्तर

मासिक पाळीचं रक्त गर्भाच्या पोषणासाठी तयार झालेलं असतं. गर्भधारणा झाली नाही तर या गर्भाशयाच्या अस्तराची गरज भासत नाही त्यामुळे ते गर्भाशयाच्या बाहेर पडतं. ते आपल्याच शरीरा तयार झालेलं आहे, त्यात घाण काही नाही. मात्र मासिक पाळीचं रक्त खाण्याची गरज काय हे तुमच्या प्रश्नातून समजलेलं नाही. एखादा विधी म्हणून, इच्छा म्हणून तुम्हाला असं करायचं आहे का कुठे वाचलं, कुणी सांगितलं म्हणून ते स्पष्ट करून सांगितलंत तर उत्तर देता येईल. 
मासिक पाळीच्या रक्तातील स्टेम सेल्सचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांसाठी होऊ शकतो असं संशोधन सांगतं मात्र त्यासाठी रक्ताचं सेवन करणं अपेक्षित नाही. तुमचा प्रश्न अधिक विस्ताराने कळवावा ही विनंती. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 9 =