प्रश्नोत्तरेCategory: Private Questionsex chlu ch thevaycha asel tr konti method better ahe

me gf aobt geli 2year month mdhun 1da as sex krtoy..ts mdhe 5 month gap pn pdlay, surwatipsun attaprynt me tila unwanted 72 dili ahe..pn tyache side effect khup ahet na, mg ata sex chlu ch thevaycha asel tr konti method better ahe..ani tila mc cha thoda tras surwatipsun mnj vayat alyapsun hotoch..shivay ata alikde..mc che pahile 2divs kmi blood jane, otipotit dukhane he chlu ch ast..condom use kela tr tich satisfaction honr nahi..soo ky kel pahije

2 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नामध्ये असलेल्या गैरसमजाविषयी बोलूयात. कंडोम वापरल्याने लैंगिक समाधान मिळत नाही हा गैरसमज आहे. लैंगिक समाधान आणि कंडोमचा वापर याचा एकमेकांशी संबंध नाही. तुम्ही दोघांनी मिळून कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवा. गर्भ्निरोधाकांविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या लेखाची लिंक खाली दिली आहे.

आता आय पिल च्या वापराविषयी बोलूयात. आय पिल्समध्ये काही संप्रेरकांचा (हार्मोन्स) समावेश असतो ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते आणि गर्भधारणा रोखली जाते. गर्भनिरोधक म्हणून आय पिल्सचा नेहमी वापर केला तर प्रत्येकवेळी पाळी लवकर येण्याची शक्यता असते आणि यामुळे मासिक पाळीचक्र बिघडते. या गोळ्या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. या गोळ्यांमध्ये असलेल्या संप्रेरकांचे (हार्मोन्स) शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. कधीकधी हे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचेही असू शकतात. शिवाय आय पिल्समुळे एच. आय. व्ही किंवा इतर लिंग सांसर्गिक आजारांच्या संसर्गापासुनही संरक्षण मिळत नाही. कंडोम हे अतिशय सुरक्षित गर्भनिरोधक आहे. आपण हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की नको असणारी गर्भधारणा टाळणं ही फक्त एकट्या स्त्रीची जबाबदारी नसून ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. गर्भनिरोधनाच्या अनेक पध्दतींपैकी ईमर्जन्सी पील्स(गोळ्या) घेऊन गर्भधारणा होण्यापासून थांबवता येऊ शकतं. परंतू या गोळ्या नियमित स्वरुपात घेऊ नये असा सल्ला अनेकवेळा दिला जातो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, या गोळ्या शरीरातील संप्रेरकांना(हार्मोन्सला) प्रभावीत करतात. म्हणजे नैसर्गिकरित्या हार्मोन्समध्ये होणार्याी बदलामध्ये कृत्रिम अडथळा निर्माण करतात. यामुळं तात्पुरत्या स्वरुपात डोकेदुखी, मळमळणं, उलटी होणं, स्तनांमध्ये दुखणं इत्यादी किंवा मासिक पाळीच्या तारखा मागे-पुढे जाणं असे परिणाम दिसू शकतात. या गोळ्य़ा नियमित स्वरुपात घेतल्यामुळे भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय मासिक चक्रावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर ७२ तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. बाजारामध्ये अनेक इतर कमी गर्भनिरोधके उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. गर्भनिरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 4 =