प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भनिरोधक गोळ्या कशा व कधी घ्याव्या?
1 उत्तर

गर्भनिरोधक गोळ्यांचे दोन प्रकार असतात. काही गोळ्यांच्या पाकिटात २१ गोळ्या असतात तर काही गोळ्यांच्या पाकिटात २८ गोळ्या असतात.

  1. पाळी सुरू झाली की पाचव्या दिवशी पहिली गोळी घ्यायची आणि पाकिटावर दिलेल्या बाणांप्रमाणे रोज एक गोळी घेत जायचं.
  2. रोज साधारणपणे सारख्याच वेळी गोळी घ्यावी. म्हणजे उदा. रोज रात्री ९ वाजता गोळी घ्यायची. त्यामध्ये अर्धा एक तास इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही मात्र फार फरक पडू देऊ नये. 
  3. जर चुकून एखाद्या दिवशी गोळी घ्यायची विसरली तर आठवेल तेव्हा लगेच दोन गोळ्या घ्याव्यात मात्र असं महिन्यातून एकाहून अधिक वेळा झालं तर मात्र दुसरं गर्भनिरोधक वापरून (कंडोम किंवा निरोध) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  4. एका पाकिटातल्या गोळ्या संपल्या (२१ किंवा २८) की एक किंवा दोन दिवसात पाळी यायला पाहिजे. पाळी आली की परत पाचव्या दिवसापासून गोळ्यांचं नवं पाकिट सुरू करावं.
  5. पाळी आली नाही तर डॉक्टरांना लगेच भेटायला पाहिजे.
  6. गोळ्या घ्यायला सुरुवात केल्यावर जर काही त्रास जाणवायला लागला तर त्वरित गोळ्या थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  7. तीन ते सहा महिने गोळ्या घेतल्यावर मध्ये एक महिना गोळ्या न घेता दुसऱ्या गर्भनिरोधकांचा वापर करा. नैसर्गिकपणे पाळी सुरू झाली की नंतर परत गोळ्या घ्यायला सुरुवात करू शकता.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोळ्या घ्यायला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. काही आजार असतील, उदा. रक्तदाब, मधुमेह, अर्धशिशी (मायग्रेन) आणि इतरही आजार असतील तर गर्भनिरोधक गोळ्या घेणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे आपली तब्येत, आजार इत्यादीबद्दल डॉक्टरांना योग्य माहिती देणं आणि त्यानंतरच गोळ्या सुरू करायला पाहिजेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 3 =