शक्यतो दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी Copper T/तांबी हे साधन वापरलं जातं.
नावाप्रमाणे या गर्भनिरोधक साधनाला एक तांब्याची तार गुंडाळलेली असते. या प्रकारच्या गर्भनिरोधक साधनांना गर्भाशयात ठेवण्याची साधने किंवा इन्ट्रा युटेरिन डिव्हाइस (IUD) म्हणतात. तांबी ही प्लास्टिकची असते आणि त्याला तांब्याची तार गुंडाळलेली असते. गर्भाशयामध्ये बसवल्यानंतर तांब्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे गर्भाशयाच्या भिंतीवर गर्भ रुजू शकत नाही. तांबी 3 वर्षं आणि 10 वर्षं वापरता येते. काही जणींना तांबी बसवल्यानंतर खूप जास्त रक्तस्राव होतो व वेदना होतात. असा त्रास होत असेल तर तांबी काढून टाकणं उत्तम. सरकारी दवाखान्यामध्ये तांबी मोफत मिळते.
तांबी मध्ये हार्मोन्स नसल्यामुळे, इतर साधनांपेक्षा याचे दुष्परिणाम कमी तीव्र असतात. जसे की, अशक्तपणा, पाठदुखी, पाळीच्या काळात तीव्र वेदना व रक्तस्त्राव, पेटके येणे, योनीमार्गात जळजळ, सेक्स दरम्यान वेदना, इ.
पण सर्वाना हे त्रास होतीलच असे नाही.
Please login or Register to submit your answer