Cuckold asked 7 years ago

मी विवाहित पुरुष असून माझी व माझ्या बायकोची सेक्स लाईफ नॉर्मल आहे . पण मला दुसऱ्या पुरूषांनी माझ्या बायकोकडे पाहिलेले व स्पर्श केलेले आवडते . मला वाटत कि तिने परपुरूषाकडून माझ्या समोर सेक्स करावा .मी तिला विचारल . ती म्हणते की जर मी स्वीकारत आहे आणि सेफ असेल तर करीन मला फक्त विचारायच आहे की यात काही वाईट नाही ना?

2 उत्तर
Answer for Cuckold answered 7 years ago

खरंतर अशा बाबतीत चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य, नैतिक- अनैतिक असं काही नसतं. प्रत्येकानं आपल्यासाठी काय योग्य, चांगलं आणि नैतिक हे ठरवायचं.

लैंगिक आनंद आणि लैंगिक क्रिया ही एक आत्यंतिक खाजगी बाब आपल्या इथे समजली जाते. त्यातून अर्थात अनेक गोंधळ निर्माण होतात आणि खाजगीपणातून अज्ञानाकडे किंवा हिंसा सहन करण्याकडे प्रवास होतो. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारला ते बरं केलं.

यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा, की तुमची जोडीदार फक्त तुमच्या आनंदासाठी, समाधानासाठी कोणत्यातरी दबावाखाली हे करण्यास तयार झाली नाही ना ? तुमची जोडीदार तुमच्या अशा सेक्सच्या कल्पनेशी कम्फर्टेबल आहे का ते परत परत पहा, विचार करा. प्रश्न तुम्ही विचारला आहे म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे की ह्यातून तुमच्या जोडीदारावर तुम्ही काही जबरदस्ती करणार असाल तर आत्ताच सावध व्हा. ती हिंसा असेल आणि तो एक गुन्हा आहे. बाकी तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. चार भिंतीच्या आत एक, दोन, तीन, चार सज्ञान लोक (कायद्याने गुन्हा नसेल तर)काय करतात ह्यात इतरांनी नाक कशाला खुपसावे..

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 3 =