hasthmaithun kelya nantr viryat ek ali (अळी ) sarkha padarth asto te kay aste v tyache kary kay??
वीर्य अनेक घटकांचं बनलेलं असतं. त्यातीलच काही भाग हा प्रथिनांचा (प्रोटीन) असतो. वीर्य शरीराबाहेर पडतं तेव्हा तापमानातील बदलामुळे वीर्य घट्ट होण्याची श्यक्यता असते. गरम पाण्यात कोंबडीचं अंडं टाकल्यानंतर ते जसं मिळून येतं त्याप्रमाणेच. तेच तुम्हाला आळीसारखं दिसत असावं. वीर्यात पुरुष बीजं असतात. वीर्याचा शरीराबाहेर काही उपयोग नसतो. वीर्य स्खलनानंतर थोड्या वेळातच ते पातळ होण्यास सुरुवात होते. स्त्रीच्या शरीरात ते आहे त्या स्थितीत अधिक काळ राहू शकतं आणि पुरुष बीजांना जिवंत ठेवून गर्भाशयात त्यांच्या इच्छित स्थळी म्हणजेच स्त्री बीजा पर्यंत पोचण्यास मदत करतं.
त्यामुळे घाबरू नका तुमच्या वीर्यात आळी वगेरे काही नाही.