प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स केल्यास शरीरातील ताकत कमी होते का? रात्रीला दररोज वीर्य नकळत गेल्यास पण ताकत कमी होते का?
1 उत्तर

सुरवातीला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणं रास्त ठरेल. लिंगातून नकळत वीर्य बाहेर पडण्याच्या क्रियेला मराठी बोली भाषेत “स्वप्न दोष” किंवा इंग्रजी मध्ये “वेट ड्रीम” असं म्हणतात. अर्थात हा “दोष” नसून एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या शब्दाचा चुकीचा अर्थ काढू नये.
वाढत्या वयात, किंवा नंतर देखील पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन्स पाझरू लागल्यानंतर जेव्हा मनात लैंगिक भावना जागृत होतात तेव्हा सेक्स केल्यानंतर किंवा हस्तमैथुन केल्यानंतर लिंगातून वीर्य बाहेर पडते परंतु खूपदा, झोपेत जेव्हा लैंगिक क्रियांबद्दल स्वप्नं पडतात तेव्हा नकळत लिंगातून वीर्य बाहेर येते. ही एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय दुसरे कारण असेही असू शकते ते म्हणजे पुरुषांच्या वीर्यकोषांमध्ये सतत वीर्याची निर्मिती होत असते. कधी कधी असं जास्तीचं वीर्य झोपेत किंवा जागृत अवस्थेत देखील नकळत बाहेर येते. ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे असं होण्याला दोष समजू नये.
आता तुमचा पहिल्या प्रश्नाचे उत्तर – सेक्स ही एक आनंददायी क्रिया आहे. शरीरातील ताकद कमी होते असा विचार करून जर का तुम्ही सेक्स करू लागला तर तुम्हाला व तुमच्या पार्टनरला आनंद तर मिळणारच नाही तर उलटपक्षी तुम्ही दोघेही असंतुष्ट रहाल. मुळात सेक्स केल्याने किंवा नकळत वीर्य बाहेर पडल्याने  झाल्याने शारीरिक ताकद कमी होते हा विचार चुकीचा आहे त्यामुळे असा विचार करणे सोडून द्या व सेक्सचा आनंद घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 7 =