अशा औषधांनी सेक्स टाईम (शरीर संबंधाचा कालावधी) वाढतो असं काही नसतं. अशा उपायांनी इरेक्शन लांबवता येतं किंवा वीर्य स्खलन लांबवता येवू शकतं. त्यामुळे ही औषधं ज्यांना लिंगात पुरेशा ताठरतेच्या अभावाची समस्या आहे अशांसाठी उपयोगी ठरू शकतात परंतु लैंगिक आनंद त्यातून वाढेल हे चुकीचं आहे. मुळात लैंगिक आनंद ही गोष्टच अनेकदा गैरसमाजांवर आधारित असते. त्यातून अनेकजण या औषधांच्या जाळ्यात अडकतात. लिंगाचा आकार वाढायला हवा किंवा लिंग प्रवेशी संबंधांचा कलावाधी वाढायला हवा हे असे सामान्य गैरसमज. लैंगिक क्रियेतील आनंद हा एकमेकांची जवळीक, विश्वास, समाधान यावर अवलंबून असतो, लिंगाचा आकार अथवा कालावधीवर नाही.
अशा औषधांचे अनेक साईड इफेक्टस आहेत. डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा र्हदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा