शीघ्रपतन होण्यास अनेक कारणे आहेत. खूपदा वाढत्या वयोमानानुसार लिंगातील ताठरतेवर परिणाम होतो. शिवाय आजकालच्या धावत्या युगात मानसिक अस्वास्थ्यामुळे देखील असे होऊ शकते. अतिरिक्त मद्य सेवन किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनामुळेदेखील हे होऊ शकते.
एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते ती म्हणजे सेक्स म्हणजे केवळ योनी मध्ये लिंग घालणे नाही. सेक्सचे अनेक पैलू आहेत ज्यातील एक महत्वाचा पैलू आहे फोरप्ले किंवा प्रणय. यातून देखील आपल्याला व आपल्या पार्टनरला शारीरिक आनंद मिळू शकतो त्यामुळे लिंगातील ताठरतेबद्दल चिंता करणे सोडून द्या. आपले मन शांत ठेवा, क्रियाशील कामांमध्ये मन गुंतवा, आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या व बोलून समस्या सुटते का ते पहा. अनेकदा शीघ्रपतनाच्या टेन्शनमुळे सेक्समधला बाकी रस कमी होतो व पूर्ण लक्ष त्या एका गोष्टीवरच केंद्रित होतं.
लैंगिक समस्यांवर बाजारामध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत परंतु खातरजमा केल्याशिवाय अशा औषधांचा वापर करणे घातक ठरू शकते त्यामुळे आपण योग्य वैद्यकीय मदत घेणे योग्य ठरेल. शक्यतो तुमच्या डॉक्टरांशी किंवा सेक्सॉलॉजिस्टशी बोला. ते तुम्हाला अधिक मदत करू शकतील.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा