सोप्पं आहे, तुमची इच्छा नसेल तर अगदी स्पष्टपणे तसं सांगा आणि तुमच्या दोघांचीही इच्छा असेल तर खालील गोष्टींचा दोघं मिळून विचार करा.
कोणत्याही नात्यामध्ये पारदर्शकता असणे नात्यासाठी चांगले असते. त्यामुळे बायकोला न सांगता अशाप्रकारचे संबंध ठेवणे तुमच्या वैवाहिक नात्यासाठी घातक ठरू शकतं.
समोरच्या मुलीचे देखील लग्न झाले आहे का? तिचे लग्न झाले असेल तर तिच्याही वैवाहिक नात्यामध्ये अशा संबंधांमुळे अडचण येण्याची शक्यता आहे. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.
नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत म्हणून योग्य ते गर्भनिरोधक वापरणे आवश्यक आहे.
निर्णय कोणताही घ्या आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील. पुढे जाऊन माझा काही सबंध नाही असं म्हणून जबाबदारी टाळू नका.