तुझा प्रश्न एच.आय.व्ही/एड्स संदर्भात असावा या दृष्टीने उत्तर लिहित आहे. तिघांपैकी कोणाही एका व्यक्तीला एच.आय.व्ही/एड्सची लागण झाली असेल तर नक्कीच खबरदारी घेणं आवश्यकच आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत शारीरिक संबंध असणार्या व्यक्तीनी कंडॊम वापरणं फायदेशीर राहतं. यातून एकमेकांना लिंगसांसर्गिक आजार होण्याचा धोकादेखील टाळता येतो. जर असे काही शारीरिक संबंध आले असतील एच.आय.व्हीची तपासणी करुन घ्या. आणि पुढील वेळी असुरक्षित शारीरिक संबंध टाळा.
लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही. ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही. ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही
याव्यतिरिक्त, एकाच व्यक्तीसोबत दोन जोडीदारांनी संभोग करणं हे त्या व्यक्तीच्या इच्छेविरुध्द नाही ना हे पाहणं खूप गरजेचं आहे. अनेकवेळा अशा नातेसंबंधांमध्ये मानसिक आणि शारीरिक ताण महिलेला खूप सहन करवा लागतो. तुम्ही विवेक बुध्दीने निर्णय घ्याल ही अपेक्षा.