खूप कमीवेळा असे प्रश्न विचारले जातात. परंतू असे प्रश्न फार महत्वाचे असतात. कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी त्याबद्दल अधिक माहिती असणं नेहमी फायदेशीर राहतं.
गर्भनिरोधनाच्या अनेक पध्दतींपैकी ईमर्जन्सी पील्स(गोळ्या) घेऊन गर्भधारणा होण्यापासून थांबवता येऊ शकतं. परंतू या गोळ्या नियमित स्वरुपात घेऊ नये असा सल्ला अनेकवेळा दिला जातो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, या गोळ्या शरीरातील संप्रेरकांना(हार्मोन्सला) प्रभावीत करतात. म्हणजे नैसर्गिकरित्या हार्मोन्समध्ये होणार्या बदलामध्ये कृत्रिम अडथळा निर्माण करतात. यामुळं तात्पुरत्या स्वरुपात डोकेदुखी, मळमळणं, उलटी होणं, स्तनांमध्ये दुखणं इत्यादी किंवा मासिक पाळीच्या तारखा मागे-पुढे जाणं असे परिणाम दिसू शकतात.
या गोळ्य़ा नियमित स्वरुपात घेतल्यामुळं भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय मासिक चक्रावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात.