प्रश्नोत्तरेसेक्स पॉवर वाढविण्यासाठी आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश करावा?
1 उत्तर

मुळात सेक्स पॉवर म्हणजे काय हे विचारात घेणे खूप जरुरी आहे कारण सेक्सची कृती ही आपल्या पार्टनर बरोबर स्पर्धा करणे किंवा आपल्या पार्टनरला आपली शक्ती दाखवणे या उद्देशातून केली गेलेली नसून दोघांनाही आनंद देणारी कृती असावी. लैंगिक समस्यांमध्ये पुरुषांना सर्वात जास्त सतावणारी समस्या म्हणजे शीघ्रपतन होणं. काहींना त्या गोष्टीची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषाचा आत्मविश्वास कमी होतो. जर का आपल्याला शीघ्र पतन होण्याची समस्या असेल तर बाजारात खूप औषधे उपलब्ध आहेत परंतु डॉक्टरी सल्ल्याशिवाय अशी औषधं घेणं अपायकारक ठरू शकतं त्यामुळे आपण त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावात. राहिला प्रश्न आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्याचा. तर आहारात काही विशिष्ट गोष्टी घेतल्याने सेक्स पॉवर वाढली आहे अशी उदाहरणं खचितच दिसतात. पौष्टिक आहार घेणं व आहारात सर्व गोष्टींचा समावेश करणे, योग्य व्यायाम या सर्व गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो व शरीर सुदृढ राहते ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या सेक्स लाईफ वर देखील नक्कीच होतो.  
पॉवरपेक्षा प्यार कधीही जास्त चांगलं.      

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 19 =