प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsForeplay अधिक आनंददायी होण्यासाठी महत्वाच्या टिप्स द्या

Foreplay अधिक आनंददायी होण्यासाठी महत्वाच्या टिप्स द्या

1 उत्तर

सर्वप्रथम तुमची आणि तुमच्या जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचाही विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे.  प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. आपल्या जोडीदाराला कोणत्या अवयवांना स्पर्श  केल्याने किंवा कोणत्या लैंगिक कृतीतून  सुख मिळते याविषयी संवाद साधा. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. किमान पहिली २० मिनिटं फोरप्ले करावा. तसेच ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 5 =