Frenulum breve

283
SG asked 4 months ago

माझ्या शिस्नमुंडाखालची त्वचा पुर्णपणे मागे जात नाही कारण ती खूप tight आहे. तेथील त्वचा elastic band सारखी ताणली गेली आहे. ह्या condition ला short frenulum म्हणतात असे म्हणतात असे माझ्या वाचनात आले होते. आपल्या बोलीभाषेत त्याला शीर असेही म्हणतात. तर ति शीर तुटणे आवश्यकच असते का आणि ति न तुटल्यास premature ejaculation सारख्या समस्या येतात का? कारण माझे लिंग खूपच sensitive आहे व माझे 9 out of 10 times premature ejaculation होतेच होते. यावर उपाय काय? कृपया याविषयी सविस्तर माहिती द्यावी..

1 Answers
let's talk sexuality answered 4 months ago

वयात आल्यावर लिंगाच्या टोकावरील शिस्नमुंडावरील त्वचा मागे पुढे होणे आवश्यक असते.

हस्तमैथुन किंवा संभोग करताना लिंगावरील त्वचा मागे जाण्यात अडचण वाटत असेल अथवा दुखत असेल तर याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो.

आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही किंवा लैंगिक सुख वाढतं असंही काही नाही.

तसेच तुम्ही म्हणत आहात ते असे आहे की, शिश्नाच्या खालच्या बाजुला, शिश्नमुंडाला चिकटलेला सैलसर त्वचेचा पदर (शिश्नबंध – frenulum) असतो. तो जर आखूड असेल तेव्हा घाई घाईने केलेले हस्तमैथुन वा प्रथम संभोगाच्या वेळी, स्त्रीचा योनीमार्ग कोरडा असतानाच उतावळेपणानं शिश्नाचा योनीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर हा पदर/शीर तुटते व रक्तस्त्रावही होतो. परंतू त्यात धोक्याचं काही नसतं. साध्या उपचारानं बरं वाटतं. तरी सुद्धा गरज वाटल्यास वैद्यकिय सल्ला घेणं योग्य ठरतं. शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग शक्यतो येत नाही.

तुमच्या प्रश्नावरून असं वाटतं आहे की तुम्ही लिंगावरील त्वचेच्या मागे न येण्याविषयी बोलत आहात. त्वचा मागे न राहण्याचं कारण ती खूप घट्ट किंवा लिंगाभोवती आवळलेली आहे असं तुम्ही म्हणताय. याबाबत योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल.