amchelagan21april zale tila15aprila palli alihot mi27aprila samand deval tyantar may mahinyt paliali nahi darekt june mahenyat pali ali. ay palipiread made mivina condomsamdha dewale . wa julala palial alinahi mhanun pagnanshi teast keli tesats pozitiv ali ase hou sakateka?
असं होऊ शकतं. हे तुमच्या पत्नीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून आहे. मासिक पाळी चक्र किती दिवसांचे आहे आणि अंडोत्सर्जन नेमकं कधी झालं यावर अवलंबून आहे. हे प्रत्येकीसाठी आणि प्रत्येकवेळी काही करणामुळे वेगवेगळे देखील असू शकते. ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित असेल तर अन्डोत्सर्जनचा काळ ओळखणं अवघड होतं.
पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळी चालू झाल्यानंतर साधारण १२ ते १६ दिवसांनी अंडोत्सर्जन होतं. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. गर्भधारणा नक्की कशी होते? याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/conception/
गरज वाटल्यास खात्री करून घेण्यासाठी पुन्हा एकदा टेस्ट करा. प्रत्यक्ष स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन खात्री करणे कधीही चांगले.