हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे.शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. मुलींनी किंवा मुलांनी कोणीही हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. पुरुषाचा लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण(orgasm) हा वीर्यस्खलन असतो. हस्तमैथुनातून असा क्षण आल्यावरही वीर्य बाहेर पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काहीही धोका होत नाही. वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा