hastmathun changlay ka wait? asked 9 years ago

1 उत्तर

हस्तमैथुन ही स्वतःला आनंद देणारी सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. मनात निर्माण होणाऱ्या लैंगिक इच्छेला वाट करून देण्याचा हा चांगला मार्ग आहे.
हस्तमैथुनामुळे स्वतःला आणि दुसऱ्यांनाही इजा होण्याची शक्यता कमीच. तसंच आपल्या लैंगिक सुखासाठी दुसऱ्यावर जबरदस्ती करण्यापेक्षा आपल्या स्वतःला हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात वाईट काय असणार?
हस्तमैथुनाचा आनंद जरूर घ्या मात्र त्याच्या आहारी जाणं टाळा. इतर काहीही न करता, आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी, मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी, काम, अभ्यास, वाचन, व्यायाम अशा सगळ्या गोष्टी विसरून फक्त हस्तमैथुन करत राहणं मात्र चांगलं नाही. याचा विचार करा. आणि तुमची मतं आम्हाला कळवत रहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 19 =