प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHirsutism आणि लैंगिक भावना यामध्ये काही संबंध आहे का कृपया सविस्तर माहिती द्या.

2 उत्तर

Hirsutism म्हणजे स्त्रीच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर केस असणे.

आता अंगावर केस का येतात? हे समजून घेवूयात. वयाच्या अंदाजे 10 व्या वर्षानंतर लैंगिक संप्रेरकांचा आपल्या शरीरावर परिणाम दिसायला लागतो. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतं. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. पुरुषांच्या शरीरात अँड्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या अंगावर केस जास्त येतात. काही स्त्रियांमध्ये जर अँड्रोजनचे प्रमाण वाढलं तर त्यांच्या अंगावरही केस किंवा दाढी मिशा येवू लागतात. यात काहीही अनैसर्गिक नाही.

स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात.

अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. म्हणूनच एखाद्या स्त्रीच्या शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे त्यावर तिच्या लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो हे अवलंबून असेल. त्यामुळे वर नमूद केलेले बदल जर जास्त प्रमाणात दिसून आले तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 18 =