प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHiv झालेल्या वेक्ति बरोबर kissing केलि तर Hiv होऊ शकतो का?

Hiv झालेल्या वेक्ति बरोबर kiss केल्यानेHiv होऊ शकतो का?

1 उत्तर

एच.आय.व्ही. झालेल्या व्यक्तिला किस केल्याने एच.आय.व्ही. होत नाही. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 7 =