सर्वात आधी तुम्ही न घाबरता आणि न संकोचता तुमच्या मनातील शंका विचारलीत याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. संभोग, सेक्स, शरीर संबंध या गोष्टी पुरुषांना माहित असतातच असा गैरसमज आपल्याकडे पहायला मिळतो. मात्र या नात्यांची काहीच माहिती नसते आणि लग्न होतं. ते झाल्यावर नक्की काय करायचं याच्या टेन्शनमुळे निम्म्या गोष्टी जमतही नाहीत. त्यामुळे तुम्ही आधीच शंका निरसन करून घेताय हे चांगलंच आहे.
सेक्स म्हणजे आपलं प्रेम, जवळीक व्यक्त करण्यासाठी जवळ येणे, एकमेकांना स्पर्श करणे, एकमेकांना आनंद मिळेल, चांगलं वाटेल अशा रितीने जवळ येणे. सेक्समध्ये कृतींचा समोवेश होतो. एकमेकांच्या शरीराला, अवयवांना कुरवाळणे, जवळ घेणे जेणेकरून आपल्या जोडीदारालाही आनंद मिळेल आणि आपल्यालाही. एक कायम लक्षात ठेवा. सेक्स ही दोघांनी एकत्र करायची आणि आनंद घेण्याची कृती आहे.
प्रणय आणि संभोग किंवा मैथुन यांचा समावेश होतो. प्रणय म्हणजे संभोगाआधी एकमेकांना सुख मिळेल, लैंगिक उत्तेजना निर्माण होईल अशा छोट्या छोट्या कृती. चुंबन घेणे, चांगल्या सेक्समध्ये प्रणयाला फार महत्त्व आहे. जेव्हा पुरुषामध्ये लैंगिक उत्तेजना टोकाला पोचते तेव्हा त्याचं लिंग ताठर व्हायला लागतं. लिंग ताठर झाल्यानंतर ते हळुवारपणे स्त्रीच्या योनीमार्गामध्ये आत सरकवायचंय स्त्रियांमध्ये लघवीच्या जागेच्या थोडं खाली यानीद्वार असतं. त्यातून पुरुषाचं लिंग आत जातं. स्त्रीमध्येही लैंगिक उत्तेजना निर्माण होणं गरजेचं असतं. त्यामुळे योनीमार्ग ओलसर होतो आणि लिंगप्रवेश सोपा होतो. स्त्रीची तयारी नसेल किंवा तिच्या मनावर दडपण असेल, लिंगप्रवेशासाठी खूप घाई झाली तर योनीमार्ग कोरडा राहतो आणि त्यामुळे स्त्रीलाही त्रास होऊ शकतो.
लैंगिक उत्तेजना शिगेला पोचली की पुरुषाच्या लिंगामधून वीर्य बाहेर येते आणि वीर्य बाहेर आल्यानंतर लिंग हळू हळू सैल पडायला लागतं आणि योनीमार्गातून बाहेर येतं. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये लैंगिक सुखाची पूर्ती कशी होते, ऑरगॅझम कसा येतो हे समजून घेण्यासाठी सेक्स बोलें तो हा विभाग नक्की वाचा.
लग्नानंतर पहिल्या रात्री हे सगळं घडायलाच पाहिजे असं मात्र नाही. तुम्ही काय काय केलं यापेक्षा तुम्ही मनाने आणि शरीराने एकमेकांच्या जवळ आलात का हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळं एकाच फटक्यात जमेल असंही नाही. वेळ घ्या, एकमेकांना विश्वासात घ्या. एकमेकांना काय आवडतं, कशाने त्रास होतो हे समजून घ्या.
सेक्सचं टेन्शन घेऊ नका. नात्यामध्ये एकमेकांची ओढ आणि प्रेम व विश्वास असेल तर या गोष्टी कधी ना कधी जमतीलच…
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा