प्रश्नोत्तरेCategory: Public Questionshow to expand the breast size which normal size..

majhya friend che stan he khupch weak ahe.
tyat aakrshkta nahi.

plz te normly kse vadhvave
upay suchvava

1 उत्तर

सर्वात आधी एक गोष्ट पक्की लक्षात घेऊ या. नॉर्मल अशी एक व्याख्या नाही. शरीराबद्दल किंवा शरीरातल्या अवयवांबद्दल नॉर्मल काय आणि कमी किंवा जास्त, लहान किंवा मोठं असं काही नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती. काही जणींचे स्तन आकाराने लहान असतात तर काहींचे मोठे. मात्र नॉर्मल असा साइझ नाही. असेल तर तो कपड्यांच्या आणि ब्रा बनवणाऱ्या कंपन्यांनी आणि फॅशन उद्योगाने तयार केला आहे. तो प्रत्येक मुलीसाठी खरा नाही. स्तन मोठे करण्यासाठी जे उपाय आता केले जातात ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी घातक आहेत, त्यात अडकू नका.
आपलं शरीर जसं आहे तसं सुंदर असतं. त्यामुळे त्यात वीक, कमजोर, कमी, लहान असं काही न मानता जसे आहोत तसे सुंदर आहोत हे समजून घ्यायचा प्रयत्न करू या. स्तन लहान असले म्हणजे ते आकर्षक नाहीत असं मानू नका. आणि टीव्ही, जाहिराती, फॅशन शोमध्ये दाखवतात त्याच्याशी आपल्या शरीरांची तुलना करत राहू नका. आकर्षक असणं अवयवांच्या मापाशी नाही तर आपण कसं राहतो, आपण कसं बोलतो, वागतो आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं.
सौंदर्य आपल्या स्वतःच्या मनात आणि नजरेत असतं. ठराविक साच्यामध्ये न अडकता जसे आहोत तसे सुंदर आहोत हे तुम्हीही समजून घ्या आणि तुमच्या फ्रेंडलाही समजावून सांगा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 2 =