प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHow To Register Hindu Marriage Act 1955 In Maharashtra?

सर मी विशेष मागासवर्गीय आहे आणि माझी बायको अनुसूचित जमातीची आमचे रितीरीवाज प्रमाणे  ०७/०७/२०१६ लग्न संपन्न झाले. त्यामुळे मला हिंदू विवाह कायदा १९५५ नोंदणी करता येईल का?

1 उत्तर

रितीरिवाजानुसार झालेल्या लग्नाची नोंद करण्याचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. तुम्हास तुमच्या लग्नाची नोदणी हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार नक्कीच  करता येईल. तुम्ही ज्या ठिकाणचे स्थायिक (दोघांपैकी किमान एका व्यक्तीचा तेथील रहिवासी पत्ता/कागदपत्र हवे.) आहात तिथे विवाह नोंदणी कार्यालय असेल. त्या ठिकाणी जाऊन विवाह नोंदणी फॉर्म भरावा. दोघांचे फोटो, दोघांचा वास्तव्याचा पुरावा, विवाह झाल्याचे affidavit, धार्मिक स्थळी लग्न केले असेल तर तेथील संबंधित व्यक्तीकडून (उदा.पुजारी) लग्न झाल्याचे सर्टिफिकेट/पावती, (असल्यास) लग्नाचा पुरावा म्हणून लग्न पत्रिका, फोटो इ. तसेच दोघांच्या वयाचा पुरावा, दोन साक्षीदारांचे ओळखपत्र, वयाचा पुरावा इ. कागदपत्रे लागतील. त्याचे सर्टिफिकेट तुम्हास त्याच दिवशी मिळून जाईल. ही नोंदणी तुम्ही स्वत: करू शकता. त्यासाठी वकिलाची गरज नाही.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 5 =