कुणावर प्रेम असण्यात, तशी भावना, ओढ असण्यात, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रकर्षाने जाणवण्यात वावगे काही नाही. असे असले तरीही संबंध ठेवावे की नाही हे खरंतर ज्याचं त्यांनं ठरवायचं असतं. कारण जवळच्या/रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाजमान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखडा ठेवून जातात आणि नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा तुमच्यावर, कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल.
सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे. शेवटी निर्णय तुमचा असतो आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील.
Please login or Register to submit your answer