चांगले की वाईट ? योग्य की अयोग्य हे खरंतर ज्याचं त्यांनं ठरवायचं असतं. भाऊ-बहिणी, आई-मुलगा यासारख्या रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाजमान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखाडा ठेवून जातात आणि भावी नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा तुमच्यावर, कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार करून निर्णय घ्या.
कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे. शेवटी निर्णय तुमचा आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील.