info asked 9 years ago

jar aamhi questions vicharto private mdhe click kele tr to prashn public mdech disnar ka??

kinva to kuth pahaycha

1 उत्तर
Answer for info answered 9 years ago

जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुमचा ईमेल, नाव किंवा अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत येत नाही. आम्हाला फक्त प्रश्न दिसतो. प्रश्नाचं स्वरूप खूपच खाजगी असेल तर आम्ही प्रश्न पब्लिक करत नाही. असे अनेक प्रश्न आम्हाला आले आहेत आणि ते आम्ही प्रायवेट पब्लिश केले आहेत. त्याची उत्तरं फक्त प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीलाच मिळतात. ती इतरांना पाहता येत नाहीत. मात्र तुमच्या प्रश्नामुळे आणि त्यावरील उत्तरामुळे इतरांनाही मदत होणार असेल तर आम्ही प्रश्न पब्लिक करतो. हे करत असताना तुमची ओळख कोणालाही, अगदी आम्हालाही उघड होत नाही याबद्दल निश्चिंत रहा.
जर तुम्हाला प्रश्न खाजगीच ठेवायचा असेल तर तुमच्या प्रश्नामध्ये मुद्दाम तसा उल्लेख करा. आम्ही तो पब्लिक करणार नाही. खाजगी स्वरुपाचे प्रश्न आणि जिथे ओळख, ईमेल उघड होते ते कमेंटमध्ये टाकू नका. तसे काही प्रश्न आम्ही कमेंटमधून काढले आहेत कारण तिथे प्रश्न विचारणाऱ्याची आणि त्याच्या प्रश्नातील संबंधित व्यक्तीची ओळख उघड होण्याचा धोका असतो.
इतर काही शंका असल्यास जरूर संपर्क साधा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 12 =