प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रश्न कठिण, इलाज जवळपास अशक्यच!

sir majhya gf che lgn tharat ahe mhnje thrl nahi aankhi pn
tiche aai vdil tya tayarit ahet.

mi tichyavr jitk prem krto titkch ti pn.

pn amhi doghehi veglya caste che ahe pn dharm hinduch ahe

tine aamchyabddl aankhi tichya vdilanna sangitl nahi

te kse react hotil he pn sangta yet nahi..

aamhi ekmekanshivay dusrya kunulach aamchya life mde yeu denar nahi..

pn jatiy bndhne khup
smajacha tras khup rahto..

aamhi nemk karaych kay putn dwidha manstithi zali ahe

1 उत्तर

तुमच्या दोघांची काळजी आम्हाला कळते आहे. काही गोष्टींचा विचार करू या.
तुम्ही दोघं स्वतःच्या पायावर उभे आहात का? घरून विरोध झाला तर तो पत्करून लग्न करण्याची दोघांची तयारी आहे का? तुम्हाला कुणाचा पाठिंबा साथ आहे का – मित्रमैत्रिणी, नातलग, इत्यादी? अशा लग्नांमध्ये काही वर्षांनी विरोध मावळू शकतो, तोपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची आपली तयारी आहे का? हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. यावर तुम्ही दोघं मनमोकळी चर्चा करा. एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादू नका पण खरंच काय शक्य आहे याचा विचार करा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोध होईलच असं गृहित धरून आपण घरच्यांना विश्वासातच घेतलं नाहीये हे जरा चुकतंय असं आम्हाला वाटतं. घरच्या कुणापाशी तरी हे बोला, त्यांना विश्वासात घ्या. आई वडील नाही तर किमान भाऊ-बहीण तरी. आणि त्यांना सांगितलंत तर त्यांनाही थोडा वेळ द्या. जातीचे काच घट्ट असतात. त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागणार त्यामुळे त्यांनाही हे सगळं समजून घ्यायला वेळ दिला पाहिजे.
सर्व गोष्टींचं नियोजन केलंत, थोडं खंबीर राहिलात, एकमेकांवर विश्वास ठेवलात आणि मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालात तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही दोघं सज्ञान असाल तर स्वतःच्या संमतीने विवाह करू शकता, त्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना मदतही करतात. पण त्याआधी आपला निर्धार किती पक्का आहे हे पहा.
वेडंवाकडं काही करू नका. आंतरजातीय विवाह होतात, ते स्वीकारलेही जातात. आणि कधी कधी त्यांना अतिशय मोठा विरोधही होतो त्यामुळे जे काही कराल ते एकमेकांची काळजी घेऊन, एकमेकांना विश्वासात घेऊन आणि दमाने करा. प्रश खठिण आहे मान्य, पण इलाज अगदीच काही अशक्य नाही. गरज आहे धीराने घेण्याची आणि खंबीरपणाची.
आमच्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट!
All the best.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी