प्रश्नोत्तरेJar khup uthat asel tar Kay karave

1 उत्तर

‘खूप सेक्सची इच्छा होत असेल तर काय करावे?’ असे तुम्हाला विचारायचे असेल असे गृहीत धरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. याव्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचे असेल तुमचा प्रश्न पुन्हा विस्ताराने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल. सेक्स मनात येणं हे काही चुकीचं नाही किंवा वाईट नाही. मनातल्या इतर भावनांप्रमाणेच सेक्सची किंवा लैंगिक भावना मनात निर्माण होते. वयात येताना, तरुणपणी किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर लैंगिक भावना मनात येऊ शकतात. त्या शमवण्यासाठी कुणी हस्तमैथुन करतं, कुणी जोडीदार असेल तर सेक्स करतं तर कुणी काही इतर प्रकारे सेक्सची भावना शमवतात. सतत सेक्सबद्दल बोलणं, फिल्म पाहणं, वाचणं या कृतीतूनही अशा इच्छा सतत मनात येऊ शकतात. लैंगिक भावना अनावर होत असतील तर थोडा गांभीर्याने विचार करा. काही साधे उपाय करून पहा.
सेक्स सोडूनही किती तरी आनंददायी भावना आहेत, आनंददायी, मन प्रसन्न करणाऱ्या, मनाला छान वाटेल अशा कृती आहेत. त्या करण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासा, फिरायला जा, एखाद्या गटामध्ये सामील होऊन तुम्ही नेहमी करत नाही अशा काही कामामध्ये सामील व्हा. सामाजिक कामाची आवड असेल तर तसं काम करणाऱ्या एखाद्या गटामध्ये सामील व्हा. तुम्हाला फिरायला आवडत असेल तर ट्रेकिंग, निसर्गसहली, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण अशा गोष्टींमध्ये रस घ्या. तुम्ही शिकत असाल तर अभ्यास इतर वाचन, चर्चा याही मनाला तितकाच आनंद देतात.
यातून काही फरक पडत नसेल तर सेकसॉलॉजिस्टना जाऊन भेटा. त्यांच्या सल्ल्याचा उपयोग होऊ शकेल.
एक लक्षात घ्या. सेक्स किंवा लैंगिक भावना वाईट नाहीत. अनावर लैंगिक भावना मात्र वेळीच ओळखली पाहिजे, तिला आवर घातला पाहिजे. तुम्ही ते करू शकाल अशी खात्री आहे. तुमचे अनुभव जरून लिहून पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 0 =