प्रश्नोत्तरेJar purshach aani syria ch rakt B positive aasel tar tyana mul hou shakt ka

2 उत्तर

समान रक्तगट असण्याचा आणि लैंगिक जीवन किंवा मुल होणं न होणं याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

पुन्हा एकदा आवर्जून नमूद करावेसे वाटते की समान रक्तगट असणाऱ्या किंवा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही.

त्यामुळे चिंता करण्याचे काहीही कारण नाही. तुमच्या दोघांनाही सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 18 =