प्रश्नोत्तरेCategory: Private Questionjast muli kiva mahilanbarobar sex keal tar mala kay tras hou shakto ka majhe vay 18 varsh ahe

jast muli kiva mahilanbarobar sex keal tar mala kay tras hou shakto ka majhe vay 18 varsh ahe

2 उत्तर

मित्रा, एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा काय त्रास होतो याचे उत्तर तुलाच शोधावे लागेल ते शोधण्यासाठी मदत व्हावी, यासाठी खालील काही मुद्द्यांची नक्कीच मदत होईल.

१. लैंगिक संबंध ही शरीराला आणि मनाला आनंद देणारी क्रिया आहे तितकीच ती एक जबाबदार क्रिया आहे. तू आता ज्या वयात आहात किंवा ज्या स्थितीमध्ये आहात त्यात तू एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत सेक्स करण्याची जबाबदारी घेऊ शकतोस का ?

२. सेक्स करताना दोन्ही जोडीदारांची इच्छा, संमती, आदर आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. इच्छेविरुद्ध किंवा खोटे आमिष दाखवून कोणाशीही लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. तू कोणाची फसवणूक तर करत नाहीस ना ?

३. लैंगिक संबंध ठेवल्यास भावनिक गुंतवणूक होण्याची शक्यता असते. असे झाल्यास तू कसा सामोरं जाशील ? तशी तुमची मानसिक तयारी आहे का?

४. तुम्ही ज्या व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवणार आहात त्यापैकी जर कोणाला लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार असतील तर तो आजार तुम्हालाही होण्याची शक्यता असते. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि लिंग सांसर्गिक आजार टाळण्यासाठी निरोधचा वापर करणे आवश्यक आहे.

शेवटी निर्णय तुझा … आणि त्या निर्णयाची जबाबदारीदेखील ! जे काही ठरवशील ते विचारांती ठरव.

तुला खूप खूप शुभेच्छा !!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 0 =