नाही. माननीय Sex expert. आमच्याकडे काही जॉब नाही. पण तुम्ही तुमच्या भागात लैंगिकतेविषयी सा सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा म्हणून काम करू शकता. आमची हे काम करण्यामागचा उद्देश आणि भूमिका मात्र समजून घ्या. ही वेबसाइट लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा व्हावा म्हणून तयार करण्यात आली आहे. लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं तरुणांना समजावीत हा या वेबसाइटचा उद्देश आहे. कोणत्याही स्वरुपातील हिंसा, जबरदस्ती, लैंगिक छळ, बलात्कार, छेडछाड, बालकांचं लैंगिक शोषण किंवा कुणाच्याही संमतीविरोधात केलेलं अश्लील चित्रण आणि त्याचं प्रसारण याचा आम्ही निषेध करतो. मुली आणि स्त्रियांवरील हिंसेला आणि अशा हिंसेला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही कृतीला, प्रसारणाला, चित्रणाला आमचा सक्त विरोध आहे. जात, धर्म, लिंग, लैंगिकता, भाषा, प्रांत, शारीरिक किंवा मानसिक क्षमता अशा कोणत्याही आधारावर केला जाणारा भेदभाव आम्हाला मान्य नाही. प्रत्येकाची लैंगिकता आणि तिची अभिव्यक्ती वेगवेगळी असते, ती ठरवण्याचा अधिकार त्या संबंधित व्यक्तीचा आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. वाढत्या वयात योग्य पद्धतीने लैंगिकतेची माहिती मिळणं आणि त्याबद्दल एक चांगली, निकोप भावना किशोरवयीन आणि तरुणांच्या मनात तयार होणं गरजेचं आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा