LGBTQI asked 8 years ago

LGBTQI (Lesbian, Gay, Bisexual, Transgender, Queer And Intersex) बद्दल संपूर्ण माहिती सांगा?

1 उत्तर
Answer for LGBTQI answered 8 years ago

समलिंगी: काही मुला मुलींना त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. मुलग्यांना फक्त मुलाग्यांबदल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं त्यांना ‘गे’ तर मुलींना मुलींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं त्यांना ‘लेस्बियन’ म्हणतात.
ट्रान्सजेंडर: ज्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे अशांना ‘ ट्रान्सजेंडर असे म्हणतात. काही मुलग्यांना लहानाचं मोठं होत असताना सातत्यानं वाटतं की ते मुलगी आहेत. तसेच ट्रान्सजेंडर स्त्रिया या शरीरानं स्त्री असतात पण मानसिक दृष्ट्या त्यांचं भाव विश्व पुरुषांसारखं असतं.
उभयलिंगी: काही मुला/मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं अशांना उभयलिंगी असं म्हणतात.
इंटरसेक्स:- ज्या व्यक्तींमध्ये जन्मतःच काही अंशी पुरुषाची व काही अंशी स्त्रीची बाह्य किंवा आंतरिक जननेंद्रिये असतात अशा व्यक्तींना इंटरसेक्स म्हणतात.
क्विअर: हा शब्द सर्वच लैंगिक अल्पसंख्यांकांसाठी एकत्रितपणे वापरला जातो. यामध्ये  गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, उभयलिंगी आणि इंटरसेक्स या सर्वांचाच समावेश होतो.
याविषयी सविस्तर माहितीसाठी बिंदुमाधव खिरे लिखीत, मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख, मनाचिये गुंती, इंटरसेक्स- एक प्राथमिक ओळख, पार्टनर तसेच इतर काही पुस्तके अवश्य वाचा.
ही पुस्तके रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय आपल्या वेबसाईट वरील ‘ सगळं नॉर्मल आहे’ या सेक्शन मधील लेख वाचा. खाली लिंक दिली आहे.   https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 19 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी