प्रश्नोत्तरेling lhan aslymule bayko shmhdhni hot nhi ka

1 उत्तर

लिंगाचा आकार, लांबी आणि जोडीदाराचे समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा  असतो. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ रहातं का, तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का हे जास्त महत्वाचं आहे. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय, आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध केले जातात. यातून जोडीदार परस्परांना लैंगिक आनंद देऊ शकतात. लैंगिक समाधान  हे प्रत्येकाच्या लैंगिक सुखाच्या कल्पनेवर अवलंबून असते असे म्हणता येईल  त्यामुळे  आपल्या जोडीदाराला कशातून लैंगिक सुख मिळते हे तुम्हाला संवादातून अधिक समजू शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 6 =