linga size asked 7 years ago

माझ्या लिंगाची लांबी ताठर झाल्यावर ३.७ इंच होते .मला सेक्स करण्यात कोणतीही अडचण येत नाही.आम्ही दोघेही सेक्स संबंधी समाधानी आहोत तर माझ्या लिंगाची लांबी नॉर्मल आहे का ? गर्भधारणे साठी लिंगाची लांबी किती असावी लागते ? मायक्रो पेनीस म्हणजे काय ?

2 उत्तर
Answer for linga size answered 7 years ago

काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही दोघेही लैंगिकदृष्ट्या समाधानी असाल तर आजीबातच चिंता नको. गर्भधारणा होण्यासाठी लिंगाची लांबी महत्वाची नसून, शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोचतात की नाही यावर अवलंबून आहे. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे.लिंगाची साईझ किती असावी यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे.

गर्भधारणा न होण्यामागे याव्यतिरिक्त इतरही कारणे असू शकतात. ती कारणे शोधण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान किंवा गर्भधारणा याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. बहुतेक वेळा पौरुष आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. लिंगाच्या आकाराविषयी प्रश्न अनेकदा चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी यासंबंधी प्रश्न-उत्तरे अवश्य वाचा.https://letstalksexuality.com/question/

मायक्रो पेनिसच्या अनेक विविध व्याख्या आपल्याला दिसून येतात. ०.७५ इंच, १ इंच, २ इंच म्हणजे मायक्रो पेनिस असं लिहलं आहे. मला वाटतं आपण त्यामध्ये नको पडायला.

महत्वाचं काय आहे तर शुक्राणू योनीत पोहतात का? संबंधाच्या वेळी लिंग ताठ राहतं का? आणि लैंगिक सुख मिळतं का? या तिन्हीमध्येही तुम्हाला अडचण नाही त्यामुळे चिंता नको. रिलॅक्स

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 15 =