प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsLove-Marriage: maz vay 26 varsh ahe and mazi gf 5 varshane mothi ahe

maz vay 26 varsh ahe and mazi gf 5  varshane mothi ahe ajun amchya lagnala 1-2 varsh lagtil.. Pudhil kalat tila garbhdharna honya sathi adchani yetil ka? And evdha vayat fark ahe tar kahi parninam hotil ka ?

1 उत्तर
Answer for love-marriage answered 8 years ago

महत्वाचे म्हणजे तुम्हाला जो वयातील फरक खूप जास्त वाटत आहे तो जास्त नाही योग्यच आहे. त्यामुळे वयातील फरकामुळे पुढे काही अडचणी निर्माण होतील अशी काळजी करू नका. लग्नाच्या नात्यामध्ये जसा मुलगा मुलीपेक्षा मोठा असलेला चालतो तसेच मुलगी मुलापेक्षा मोठी असेल तर काहीही समस्या नाही. तुमचे एकमेकांवर प्रेम असेल, विश्वास असेल आणि लग्नाचं नातं एकमेकांसोबत जगायचं असेल तर बाकी गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता नाही. राहिला प्रश्न गर्भधारणेचा. सर्वसामान्यपणे १८ ते ३० हे वय गर्भधारणेसाठी सुरक्षित मानले जाते. १८ च्या आतील आणि ३० नंतर झालेल्या गरोदरपणात काही धोके उद्भवण्याची शक्यता असते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि निरीक्षणाखाली अनेक ३० च्या गर्भधारणेस अडचण येत नाही मात्र काही धोके उद्भवण्याची शक्यता असते. गरोदर होण्यासाठी फक्त वयाचा विचार न करता, स्त्रीच्या आरोग्याची स्थिती, तिची मानसिक तयारी, इच्छा या गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे. 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 0 =