महिन्यातून कितीवेळा सेक्स करावा? याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. मात्र जितक्यावेळी होईल त्या प्रत्येकवेळी तो दोघांच्या संमंतीनं होणं फार आवश्यक आहे. सेक्स(संभोग) करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. त्यामुळं आनंदाची कृती कोणी कितीवेळा करावी हे प्रत्येकानं ठरवणं आवश्यक असतं. खरतरं अशा विषयांवर जोडीदाराशी बोलणं जास्त फायदेशीर राहतं. तुमचा जोडीदार लैंगिक कृतींना कशाप्रकारे बघतो? त्याच्या किंवा तिच्या काय अपेक्षा आहेत? यानिमित्ताने तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळते. त्यामुळं महिन्यातून किती वेळा करावं यापेक्षा कितीवेळा करुन आनंद मिळेल याकडं लक्ष द्या.
Please login or Register to submit your answer