काळजी करु नका. मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रामध्ये अशी सोय उपलब्ध असते. सरकारी किंवा खाजगी यापैकी कुठेही(मान्यताप्राप्त) दवाखान्यांमध्ये २० आठवड्यापर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये २२ आठवड्यापर्यंतचा गर्भपात करता येवू शकतो. गर्भपात केंद्रामध्ये आवश्यक माहिती दिल्यानंतर गर्भपात करवून घेता येतो. यात गैर असं काही नाही. गर्भपात करणं हा स्त्रीचा कायदेशीर अधिकार आहे. जितक्या कमी दिवसामध्ये होईल तितकं जास्त फायदेशीर राहतं.
हे लक्षात ठेवा, गर्भनिरोधक वापरण्याची जबाबदारी दोघांची आहे. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ती गर्भनिरोधकं वापरणं आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम स्त्रीवर जास्त होताना दिसतात. अशावेळी तुमच्या जोडीदाराला मानसिक आधाराची जास्त गरज भासू शकते. तिला धीर द्या. योग्य मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या.