प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMajhya lingachi size lahan aahe. Mala mulan barobar sex karavasa vatato

mazi lingachi size lahan ahe . ti vadvta yeil ka ani maze vrushan itar mulan phekha mothe vatata. mal mule jast avadtat mulinchy pramant mulan barobar sex karavas vato. tar ya sathi kay karu

1 उत्तर
Answer for hi answered 8 years ago

पहिल्यांदा तुमच्या पहिल्या प्रश्नाविषयी जाणून घेऊयात. लिंगाची लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. जर उत्तेजित लिंग १ इंचापेक्षा कमी आहे का ? असेल तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. यात काही अडचण येत नसेल तर निश्चिंत रहा. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंगाचा आकार/साईझ वाढवण्याचा कोणताही शास्त्रीय उपाय  नाही तसेच लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखात आजीबात बाधा येत नाही. लिंगाच्या लांबीविषयी चर्चिले गेलेले वेबसाईटवरील इतर प्रश्नोत्तरे नक्की वाचा. व्यक्ती तितक्या प्रकृती. काही अडचण येत नसेल तर निश्चिंत रहा. काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
वृषणाची साईझ याविषयी तसेच तुमच्या लैंगिक कलाविषयी बिंदुमाधव खिरे यांच्याशी संपर्क साधा.बिंदुमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट, पुणे. 020 6417 9112

येथे लैंगिक कलाविषयी थोडक्यात माहिती दिली आहे. वयात आल्यावर कोणत्या लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटते तो आपला लैंगिक कल असतो. याविषयी समजून घेवूयात.
समलिंगी: काही मुला- मुलींना त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. मुलग्यांना फक्त मुलाग्यांबदल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं त्यांना ‘गे’ तर मुलींना मुलींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं त्यांना ‘लेस्बियन’ म्हणतात.
उभयलिंगी: काही मुला/मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं अशांना उभयलिंगी असं म्हणतात.
तुम्हाला जर मुलाग्यांबदल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही. जे आहे ते स्वीकारा. निसर्गतः जे मिळाले आहे त्याला बदलायचा प्रयत्न करणे म्हणजे ताण तणाव ओढवून घेणे आहे तसेच द्विधा मनः स्थितीमध्ये जगण्यासारखे आहे. भारतीय मानसशास्त्रज्ञ संघटना आणि जनातिक मानसशास्त्रज्ञ संघटना समलैंगिकता हा मानसिक आजार मानत नाही.
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. याशिवाय आपल्या वेबसाईट वरील ‘ सगळं नॉर्मल आहे’ या सेक्शन मधील लेख वाचा. खाली लिंक दिली आहे.
https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 1 =