Maji GF preganant ahe ky karu asked 8 years ago

2 उत्तर

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुझ्या मैत्रिणीला तुझ्या सोबतीची, मदतीची गरज आहे. तिची साथ सोडू नकोस. तू इथे प्रश्न विचारला आहेस यावरून तू स्वतःची जबाबदारी ओळखून ती पार पाडत आहेस, हे लक्षात येतच आहे.

प्मैत्रिणीची प्रेग्नन्सी टेस्ट केली आहे का? टेस्ट केली असशील आणि त्यातून कळत असेल दिवस गेले आहेत तरच गर्भपात करण्याची गरज आहे. प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा.

गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.

गर्भपात करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि मदतीशिवाय गर्भपात करणं जिवासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांकडे न जाता गर्भपात करण्याचा, त्यासाठी काही उपाय करण्याचा विचारही करू नकोस. अशा कोणत्याही उपायांनी गर्भपात होत नाही. उलट शरीराला आणि गर्भाशयाला गंभीर इजा होऊ शकते.

18 वर्षांहून मोठी असललेली मुलगी तर स्वतःच्या जबाबदारीवर, आई-वडलांच्या संमतीशिवाय तुला गर्भपात करून घेऊ शकते. कोणी तरी मोठी (सज्ञान) व्यक्ती सोबत असणं गरजेचं आहे. तुमची सोबत आणि मदत खूप महत्वाची आहे.

विश्वासातली एखादी मोठी मैत्रीण किंवा नातेवाईक यांची देखील सोबत होऊ शकेल.

जितक्या जास्त लवकर गर्भपात करता येईल तितका चांगला. जास्त दिवस गेले तर त्यानंतर त्यातली गुंतागुंत वाढू शकते. पहिल्या महिन्यात किंवा दोन महिन्यात गर्भपात करणं जास्त जिकिरीचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीनेच हा निर्णय घेणं श्रेयस्कर आहे.

पुढे एक पत्ता दिला आहे, तिथे फोन करून चौकशी करून घे. ही संस्था सुरक्षित गर्भपाताची सेवा देते आणि तिथे तुझी ओळख उघड होणार नाही. त्यामुळे न संकोचता फोनवर चौकशी कर. खरं तेच सांग. तुझं वय, किती दिवस झाले आहेत या गोष्टी खऱ्या सांग. तू पुण्यात राहत असलीस, तर तुला या ठिकाणी गर्भपाताची सेवा मिळू शकेल. नाही तर तुझ्या भागामध्ये कुठे अशी सेवा मिळेल त्याची माहिती तुला इथे मिळेल.

Family Planning Association of India,

Pune Branch, 101,

Western Court, 1082/1,

Ganeshkhind Road, Opposite E-Square Cinema,

Shivajinagar, Pune 411 016

Tel. No. : 020-65601453 to 65601457

अधिक माहितीसाठी तुम्ही 9075 764 763 या मर्जी हेल्पलाईनला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये फोन करू शकता. या हेल्पलाईन विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

डॉक्टरांकडे न जाता गर्भपात करण्याचा विचारही करू नकोस. आणि टेन्शन घेऊ नकोस.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 12 =