काही मुलींची पाळी 9 व्या वर्षी सुरू होते तर काही जणींना 16-17 वर्षांपर्यंत पाळी येत नाही. जर तब्येतीच्या इतर काही तक्रारी नसतील तर हे स्वाभाविक किंवा नॉर्मल मानलं जातं. मुलींच्या शरीराची वाढ अनेक कारणांवर अवलंबून असते. अनुवांशिक गुण, पोषण, व्यायाम, मानसिक स्थिती तसंच ताण तणाव अशा अनेक घटकांचा वयात येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असतो. काही मुलींमध्ये मात्र गर्भाशय किंवा बीजकोषांच्या रचनेमध्ये काही अडचणी असतात किंवा काहींच्या शरीरामध्ये जन्मतः गर्भाशय नसतं किंवा त्याचा आकार उलटा असतो. अशा वेळी मुलींना पाळी येत नाही. वयाच्या 17-18 वर्षांपर्यंत पाळी नियमितपणे आली नाही तर वैद्यकीय तपासणी करून घेण्याची गरज भासू शकते. अधिक महीतीसाठी खालील लिंकवरील माहिती वाचा.
2 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा