यासाठी तुम्हाला डॉक्टरच मदत करू शकतील. आवश्यकता असल्यास आणखी एखाद्या डॉक्टरांचे मत घ्या.
त्यांनीदेखील पाळी येणार नाही असे सांगितले तर स्वतःला स्वीकारा. आपल्या पुरुषप्रधान समाजाने स्त्रीचे आयुष्य पाळी, लग्न, मुल याभोवती आणि यापुरतेच मर्यादित ठेवले आहे, हे जरी खरं असलं तरी एक माणूस म्हणून स्त्रीचे आयुष्य याहून खूप जास्त आहे. त्यामुळे खचून जाऊ नका, स्वतःला दोष देऊ नका, तुमच्यात काही कमी आहे असे समजू नका आणि अपराधीदेखील वाटून घेऊ नका. निसर्गतः तुम्ही जसे आहेत तसे खूप छान आणि सुंदर आहात.
एक माणूस म्हणून सुंदर आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !